मी तिला विचारलं
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........
तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय?
घेणार काय?
हुंडा किती,
बिंडा किती?
याचा मान,
त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...
ते सगळं जाउ द्या,
मला माझं गाणं गाउ द्या..
मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
त्या धुंदीत, त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,
असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,
खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो
हिंडत पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते
बघतजीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?
मी तिला विचारलं,तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......
.मग एक दिवस,चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं
तरिसुद्धा तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे
मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......
पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,
मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...
तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं....... मंगेश पाडगावकर
6 comments:
thank u very much for comment..first comment on blog :)
:)padgavkar gr8ch aahet...
thx fr posting it.nice1
मला नव्हती माहित ही पाडगावकरांची कविता... आणि शेवटपर्यंत त्यांचं नाव वाचेस्तोवर मी समजत होते कि तूच लिहिलेयस...आणि व्वा...किती सुंदर लिहिलेयस!! :D
धन्यवाद...कविता निदर्शनात आणून दिल्याबद्दल. :)
Anagha,
Thank you very much!
Padgaokaranchi krupa sagali
Mee nimittamatra!
खरच सुंदर कविता आहे...
थॅंक्स फ़ॉर शेअरिंग (मला पण वाचतांना तुझीच वाटत होती)
Post a Comment